Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट! IMD ने दिला यलो अलर्ट, घराबाहेर पडताना काळजी घ्या!

0
12
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट! IMD ने दिला यलो अलर्ट, घराबाहेर पडताना काळजी घ्या!


या जिल्ह्यात थंडीची लाट

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभागात हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज जळगाव, अहिल्यानगर, पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उद्या जळगाव, अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात आज उद्या आकाश मुख्यता कोरडे राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.



Source link