Maharashtra Weather Update : राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी! कसं असेल आजचं हवामान ? IMD चा अलर्ट

0
15
Maharashtra Weather Update : राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी! कसं असेल आजचं हवामान ? IMD चा अलर्ट


Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर तापमानात मोठी वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच अवकाळी पावसाचे संकट देखील राज्यावर घोंगावत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यातील घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



Source link