
Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सातारा, तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सकाळ पासून सुरू असलेल्या पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज वर्तविला आहे. आज रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज





