
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला सर्वोत्तम न्याय द्यायचा प्रयत्न, चित्रपटाशी निगडित सर्वच घटकांकडून पुरेपूर झाल्याचं दिसून येत. एक उत्तम अनुभव घ्यायचा असेल तर, आपण सर्वांनी देखील हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की पहावा’, असे त्यांनी म्हटले आहे. तर, मोबाईल-लॅपटॉपसारख्या स्क्रीनवर न बघता, मराठी माणसाने २००-४०० रुपये खर्च करून चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट बघावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.








