महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: आदर्श आचारसंहिता लागू, मतदान 20 नोव्हेंबरला

0
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: आदर्श आचारसंहिता लागू, मतदान 20 नोव्हेंबरला

सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

निवडणूक वेळापत्रक

अधिसूचना प्रसिद्धी: 22 ऑक्टोबर 2024

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक: 29 ऑक्टोबर 2024

अर्ज छाननी: 30 ऑक्टोबर 2024

अर्ज माघारी: 4 नोव्हेंबर 2024

मतदान: 20 नोव्हेंबर 2024

मतमोजणी: 23 नोव्हेंबर 2024

जिल्ह्यात महिलांच्या नेतृत्वाखाली 16, दिव्यांगांच्या नेतृत्वाखाली 8, आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली 16 मतदान केंद्रे असतील.

मतदान प्रक्रियेतील सोयीसुविधा जिल्ह्यात दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था केली असून, मतदान केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा असेल. 85 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा दिली जाईल.

सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था सातारा जिल्ह्यात एकूण 3,165 मतदान केंद्रे असतील. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 165 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3,573 पोलीस कर्मचारी, 3,471 होमगार्ड, 6 राज्य राखीव पोलीस बल कंपनी आणि 4 केंद्रीय निमलष्करी बल कंपनी तैनात करण्यात येणार आहेत. 18 ऑक्टोबर रोजी सीमा सुरक्षा बलाच्या 2 कंपन्यांचे आगमन होईल. जिल्ह्यात 5,111 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, तर शस्त्र जमा करणाऱ्यांमध्ये 2,692 जणांचा समावेश आहे.