Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशLOKSABHA ELECTIONS 2024 | अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार; कारणही तसंच,...

LOKSABHA ELECTIONS 2024 | अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार; कारणही तसंच, जाणून घ्या नेमकं झालं तरी काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

LOKSABHA ELECTIONS 2024  | अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार; कारणही तसंच, जाणून घ्या नेमकं झालं तरी काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार; कारणही तसंच, जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?

गेली अनेक दिवसांपासून हा गावाचा रस्ता बंद आहे. याची तक्रार केल्यानंतर त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट प्रशासनातील अधिकाऱ्यानी गावकऱ्यांनाच सुनावले असे गावकऱ्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिलाच टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरु आहे. देशामधील १०२ मतदार संघ मोठ्या उत्साहामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. उत्तर प्रदेशच्या पीलीभीत आणि कैराना लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एका गावाने मतदानावर बहिष्कार घातला आहे. पीलीभीत मतदारसंघातील बकसपुर गावातील गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी गावात आले. त्यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. गावातील एका जुन्या रहदारीच्या रस्त्याला प्रशासनाने बंद केल्यामुळे बकसपुर गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अरेरावी केल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला. बकसपुर गावातील रस्ता अनेक दशकांपासून ऑफिसर्स कॉलनीमधून जाणारा रस्ता रहदारीसाठी ते वापरत होते. परंतु गेली अनेक दिवसांपासून हा गावाचा रस्ता बंद आहे. याची तक्रार केल्यानंतर त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट प्रशासनातील अधिकाऱ्यानी गावकऱ्यांनाच सुनावले असे गावकऱ्यांनी सांगितले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments