Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशLOKSABHA ELECTION 2024 | कॉंग्रेसमधून गळती सुरूच; आणखी एका उमेदवाराने परत केले...

LOKSABHA ELECTION 2024 | कॉंग्रेसमधून गळती सुरूच; आणखी एका उमेदवाराने परत केले लोकसभेचे तिकीट | Navarashtra (नवराष्ट्र)

LOKSABHA ELECTION 2024 | कॉंग्रेसमधून गळती सुरूच; आणखी एका उमेदवाराने परत केले लोकसभेचे तिकीट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कॉंग्रेसमधून गळती सुरूच; आणखी एका उमेदवाराने परत केले लोकसभेचे तिकीट

कॉग्रेसच्या आणखी एका उमेदवाराने आपले लोकसभेचे तिकीट पक्षाला परत दिले आहे. याचे कारणही विचार करायला लावणार असे आहे. परंतु, कॉंग्रेसवर मात्र नामुष्की ओढवली आहे.

ओडिशा : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे तिकिटासाठी अनेक जण इच्छुक असतात, पण ज्यांना तिकीट मिळते ते खरेच स्वतःला भाग्यवान समजतात. पण कॉग्रेसच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. कारण, कॉग्रेसच्या आणखी एका उमेदवाराने आपले लोकसभेचे तिकीट पक्षाला परत दिले आहे. याचे कारणही विचार करायला लावणार असे आहे. परंतु, कॉंग्रेसवर मात्र नामुष्की ओढवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी ओडिशा कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुरी, ओडिशामधील कॉग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. शनिवारी माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या की, पक्ष मला निधी देऊ शकला नाही म्हणून मी तिकीट परत केले आहे. दुसरे कारण म्हणजे सात मतदारसंघांतील काही जागांवर विजयी उमेदवारांना तिकीट दिले गेलेले आहे. त्याऐवजी काही कमकुवत उमेदवारांना तिकीट मिळाले त्यामुळे मी अशा परिस्थितीत निवडणूक लढवू शकत नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments