
राज्यातील राजकारणावर बोलताना तृप्ती देसाईंनी म्हटलं की, अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात राष्ट्रवादीत फुट पडली नाही. मात्र जनतेचा रोष मतांद्वारे व्यक्त झाल्यास तुम्हाला कळेल लोकांना फसवता येणार नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोला,तुमचे भाऊ आहेत तर तुम्ही त्याच्या बरोबर भाजपमध्ये जा असा घणाघात तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला आहे.






