Thursday, August 27, 2026
Homeब्लॉगसेव बुध्दा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक व संघमित्रा महिला लेणी समूह...

सेव बुध्दा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक व संघमित्रा महिला लेणी समूह महाराष्ट्र यांचे स्तुत्य उपक्रम…!

रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी सेव बुध्दा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक व संघमित्रा महिला लेणी समूह महाराष्ट्र यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली जवळील दुर्गम पाहाडावरील “ठाणाळे/ नाडसुर लेणीवर” दिशादर्शक फलक व नाम फलक लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

लोकवर्गणीतून” दिशादर्शक / फलक लावण्याचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न अनेक संघटनांकडून मागील काही दिवसांत हाती घेण्यात आल्याचे आपण सर्वांनीच पाहीले आहे पण “लोकवर्गणीतून” फलक दिशादर्शक न लावता आपल्याच संघटनेकडून स्व खर्चाने दिशादर्शक व फलक लावण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला होता.

सोप्या सहज चढाई करता येईल अशा लेणीवर असे उपक्रम राबविणे सोपे आहे पण अतिशय दुर्गम असणाऱ्या व चढाईला कठीण असलेल्या लेणीवर असे उपक्रम राबविणे म्हणजे महाकठीण काम पण हे महाकठीण काम सेव बुध्द केव अँड हेरिटेज व संघमित्रा महिला समूह महाराष्ट्र यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

लेणीला भेट देणारे अभ्यासक व पर्यटक रस्ता चुकू नये व जंगलात पहाडात भरकटून जाऊ नये म्हणून विशिष्ट अंतरावर हे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत या फलकांवर आपल्या संघटनेचे नाव देखील कुठेही प्रसिद्ध केले गेलेले नाही हे विशेष, मोकळ्या हाताने चढाई करणे जिथे कठीण ठरते तिथे संघटनेच्या तरूण संवर्धकांनी वाळू सिमेंटसह लेणीवर चढाई केली त्या सर्व तरूण लेणी संवर्धकांचे अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार या लेणीवर ज्या माता भगिनी तळपत्या उन्हात न डगमगून जाता उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेत होत्या त्यांना करमळांनी नमन, या उपक्रमात मला सहभागी करून घेतले व मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्या बद्दल सेव बुध्दा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक, संघमित्रा महिला लेणी समूह महाराष्ट्र यांच्या वतीने Deepak Gaikwad यांनी आमंत्रित केले त्याबद्दल त्यांचे व सर्वांचेच मनापासून आभार.

व्यस्त असतांना देखील मला लेणीवर आपल्या बाईकवरून घेऊन जाणारे माझे मित्र गौतम कदम यांचे देखील मनापासून आभार…!

सूरज जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments