Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनKKK 14 Winner : करणवीर मेहरा ठरला रोहित शेट्टीच्या शोचा विजेता! ट्रॉफीसोबत...

KKK 14 Winner : करणवीर मेहरा ठरला रोहित शेट्टीच्या शोचा विजेता! ट्रॉफीसोबत काय काय मिळालं पाहा…

[ad_1]

कलर्स टीव्हीच्या ‘खतरों के खिलाडी’ या साहसी रिॲलिटी शोचा १४वा सीझन नुकताच संपला आहे. नुकताच या शोचा फिनाले पार पडला, यात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा रोहित शेट्टीच्या या शोचा विजेता ठरला आहे. ‘खतरों के खिलाडी १४’च्या चमकदार ट्रॉफीसोबतच करणवीरला एक आलिशान कार आणि २० लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे. करणवीर मेहरासाठी या शोचा प्रवास सोपा नव्हता. त्याच्या पायात मेटल प्लेट असल्यामुळे, त्याला विद्युत प्रवाहाचा समावेश असलेले स्टंट करताना विजेच्या जोरदार झटक्यांचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर, अंतिम फेरीच्या वेळी देखील, त्याला पहिल्या ३ स्पर्धकांमध्ये येण्यासाठी इलेक्ट्रिकल स्टंटचा सामना करावा लागला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments