
‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यासाठी भाईजानच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भाईजानच्या चाहत्यांमध्ये ‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिक देखील आहे. अब्दू रोजिक याने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करण्याची घोषणा केली आहे. अब्दू सलमानच्या चित्रपटासाठी संपूर्ण सिनेमा हॉल बुक करणार आहेत. सलमानच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत अब्दूने स्वतः याबद्दल सांगितले आहे.






