
Modi Government Budget 2025: भारत सरकारकडून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली. यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपये होती. यावेळी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढणार असल्याची बरीच चर्चा झाली होती.