
या विषयी बोलताना त्यांनी पुढे लिहिले की, ‘मी आता त्या नाटकावर सिनेमा लिहीतोय. जाणीवपूर्वक साऊंड डिझाईनवर स्पेशल सुचना लिहीताना कायम लैच कृतज्ञतापूर्वक तिची आठवण येते. तिनं त्यावेळी हे सुचवलं नसतं, तर कदाचित त्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडं माझं दुर्लक्ष झालं असतं. सोनालीनं बाॅलीवूडमध्ये लै नांव कमावलं. आंतरराष्ट्रीय सिनेमांमधनंबी कामं केली. तरीही आमच्या ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’शी असलेलं जुनं नातं टिकवून तिनं समाजभान जपलंय. आजही ती अत्यंत बिझी असूनही संभाजी भगत यांच्या विनंतीचा मान राखून संविधान प्रेमी कलावंतांच्या मेळाव्याला आली. सोनालीची हीच गोष्ट तिला इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा एक पायरीवर नेते. सोनाली, तू अशीच गोड आणि डाऊन टू अर्थ रहा. लब्यू!’ जिथे दोन कलाकार एका मंचावर दिसणं कठीण असतं, अशा वेळी कलाकारांनी एकमेकांचं कौतुक करणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.








