Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनKetaki Mategaonkar: 'बडा कमजोर लेग पीस है', असे म्हणणाऱ्याला केतकी माटेगावरकरचे सणसणीत...

Ketaki Mategaonkar: ‘बडा कमजोर लेग पीस है’, असे म्हणणाऱ्याला केतकी माटेगावरकरचे सणसणीत उत्तर

Ketaki Mategaonkar: ‘बडा कमजोर लेग पीस है’, असे म्हणणाऱ्याला केतकी माटेगावरकरचे सणसणीत उत्तर

[ad_1]

पुढे ती म्हणाली, “डिअर ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी, (हाडांचा सापळा) बारीक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक, तशी मी सुद्धा आहे बारीक. तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल! पण म्हणून रोगी (Unhealthy) आहे का? तर अजिबात नाही! व्यायाम किंवा जीम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके.पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शारिरीक भागावर (Body Parts) खुलेपणाने कमेंट करणं, याला तुम्ही ‘स्वातंत्र्य’ आणि ‘शाब्दिक स्वातंत्र्य’ असं नाव देता. आम्ही ट्रोलिंगपासून मुक्त झालो असलो तरी, १०० आणि १००० सुंदर लोकांच्या तुलनेत तुमची संख्या फार कमी आहे. जे आम्हाला पाठिंबा देतात आणि प्रेरित करतात. आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. आम्हालाही दुखापत होते. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. याचा विचार करा.आणि काही लोकं असे ही असतील ज्यांना खरंच वैद्यकीय समस्या (Medical problem) असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल… कल्पना करा की, तुम्ही त्यांना कोणत्या भयंकर मानसिक अवस्थेमध्ये टाकत आहात. थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments