
करण आणि द्रिशाचा लग्न सोहळा मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोबळ्यात सनी, बॉबी आणि अभय देओल तिघेही मजामस्ती करताना दिसले. करणचे आजोबा धर्मेंद्र देखील बेधुंद होऊन नाचताना दिसले. करणच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मात्र, हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा-अहाना कुठेही दिसल्या नाहीत. त्या गैरहजर का होत्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे.







