
मीडिया रिपोर्टनुसार, द कपिल शर्मा शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘शोमध्ये अशाप्रकारे ब्रेक घेणे शोसाठी खरोखर फायदेशीर ठरले आहे. अशा ब्रेक्समुळे कंटेंट आणि कलाकारांच्या बाबतीत काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळाली. तसेच, कॉमेडी हा एक अतिशय कठीण प्रकार आहे आणि कलाकारांना ब्रेक आवश्यक आहे.’ याआधी देखील या शोने एक मोठा ब्रेक घेतला होता. मात्र, त्यांनतर नव्या ताकदीने ‘द कपिल शर्मा शो’ मोठ्या पडद्यावर परतला होता. आता हा शो पुन्हा एकदा ऑफ एअर जाणार हे ऐकून चाहते देखील नाराज झाले आहेत.






