
अभिनेता कपिल शर्मा याचे हे नवे ट्विट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘इंडिगो’ या विमान कंपनीवर आपला राग व्यक्त करत कपिल शर्माने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आधी तुम्ही आम्हाला ५० मिनिटे बसमध्ये थांबायला लावले. आता तुमची टीम म्हणते की, पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. खरंच? ८ वाजता या विमानाने उड्डाण करायला हवे होते, पण आता ९.२० झाले आहेत.’








