Kangana Ranauat : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी कंगना रनौतने पाहिली अद्भुत घटना! पोस्ट शेअर करत म्हणाली…

0
22
Kangana Ranauat : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी कंगना रनौतने पाहिली अद्भुत घटना! पोस्ट शेअर करत म्हणाली…


प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान कंगना रनौत अतिशय उत्साही दिसली. रामलल्लाचा अभिषेक होताच कंगना ‘जय श्री राम जय श्री राम’ म्हणत जोरजोरात नाचताना दिसली. त्याचवेळी कंगनाने तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र घटनेचा अनुभव शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची मूर्ती घडवल्याची गोष्ट शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘माझ्यासोबतही एक आश्चर्यकारक घटना घडली. रामलल्लाचा अभिषेक होताच लष्कराच्या हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव सुरू केला. त्यावेळी मी वर पाहिले, तर महाकाय पक्षी दिसत होते. लष्कराच्या हेलिकॉप्टरांच्या आजूबाजूने ते देखील उड्डाण करत होते. असं वाटत होतं जणू काही तेही फुलांचा वर्षाव करत आहेत. माझी बहीण म्हणाली की ते जटायू आणि संपती आहेत. नंतर पुन्हा मी वर पाहिले, तेव्हा ते गायब झाले होते. ते दोन दैवी पक्षी आणखी कोणी पाहिले?’



Source link