
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्री सुरू असल्याने कल्याण शहरातल्या टावरीपाड्यात गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये आशीष राजू पाटील नावाचा तरुण सहभागी झाला होता. आशिष गरबा खेळत असताना दीपेश गायकवाड नावाच्या तरुणाने त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला. तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याचं समजताच उपस्थितांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आशिषला वाचवलं. परंतु आरोपी दीपेश तोपर्यंत घटनास्थळावरून फरार झाला होता. काही वर्षांपूर्वी आशिषने दीपेशच्या वडिलांना मारहाण केली होती, त्याच्या रागातूनच दीपेशने आशिषवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







