Kalam 376: मराठीतही पाहायला मिळणार कोर्ट रूम ड्रामा; नव्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का?

0
22
Kalam 376: मराठीतही पाहायला मिळणार कोर्ट रूम ड्रामा; नव्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का?


आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र, स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्डहिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं मराठीत अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे ‘कलम ३७६’ हा चित्रपट कथानक कशा पद्धतीनं मांडणार याकडे लक्ष लागले आहे. ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या ‘कलम ३७६’ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसते. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.



Source link