JNU new rule : देशविरोधी घोषणा दिल्यास १० हजारांचा दंड; जेएनयूच्या नव्या नियमावलीमुळे वादंग

0
18
JNU new rule : देशविरोधी घोषणा दिल्यास १० हजारांचा दंड; जेएनयूच्या नव्या नियमावलीमुळे वादंग


Delhi JNU rule: देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे विविध कारणांनी चर्चेत असते. कधी विद्यार्थ्यांवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप होतो तर कधी बंदी घातलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळेही ही विद्यार्थी चर्चेत असते. आंदोलने आणि निदर्शने या विद्यापीठाला नवे नाही. यात अनेकदा देशाच्या विरोधातच घोषणा दिल्याच्या घटना देखील घडल्या आहे. आता हे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या विद्यापीठात आता आंदोलन करतांना वा कोणत्याही कारणाने निदर्शने करतांना देश विरोधात घोषणा बाजी केल्यास आता १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. जेएनयू प्रशासनाच्या या निर्णया विरोधात आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी विद्यापीठातून मशाल मोर्चा काढत याचा निषेध केला आहे.



Source link