
“झिम्मा चित्रपटात सोनालीने साकारलेले पात्र मैथिली आणि मी साकारलेले पात्र निखिल यांच्या गोष्टीचा शेवट गोड करण्यात आला होता. उगाच मला त्यात ड्रामा क्रिएट करायचा नव्हता. ओढून ताणून मला त्यात हवा भरायची नव्हती. तसेच रमाच्याबाबतीत आम्हाला वाटले की, ती पहिल्या भागात सारखे मुल व्हावे याबद्दल बोलत असते. त्याचे कनेक्शन देखील तुम्हाला झिम्मा-२मध्ये दिसेल. पण, जर प्रेक्षकांचे प्रेम लाभले, तर आम्ही झिम्मा ३ बनवला तर त्यात त्या दिसतील” असे हेमंत म्हणाला.







