
आंदोलना दरम्यानच त्याने रस्त्यावर जाळलेल्या टायरवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांनी त्याला पकडून त्याची समजूत काढली होती. त्यानंतर त्याला जानेफळ गावात नेऊन सोडले होते. मात्र त्याने शेतात फवारणीसाठी आणलेले किटकनाशक प्यायले. त्याला तत्काळ जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मनोहर याचा अडीच वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगाही असल्याची माहिती सामोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.






