
इस्रायलने गाझामधील स्थानिक भागात गोळीबार तीव्र केला आहे. इस्रायली सैन्याला गाझामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हमास सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गाझामधील निवासी भागांवर इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel–Hamas War) सुरू झाल्याचा शनिवार हा 22 वा दिवस आहे. दरम्यान, इस्रायली संरक्षण दल (IDF) आणि हवाई दलाने गाझा पट्टीवर (Gaza ) हल्ले तीव्र केले. गाझामध्ये शुक्रवारी मध्यरात्री जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पांढऱ्या फॉस्फरस बॉम्बचा (White Phosphorus Bomb) वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गाझामध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याचा (Mobile-Internet Shut Down) हमासचा दावा आहे. यावरून इस्रायलचा गाझावरील जमिनीवरील हल्ला पुढील टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हे सुद्धा वाचा
इस्रायलने गाझामधील स्थानिक भागात गोळीबार तीव्र केला आहे. इस्रायली सैन्याला गाझामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हमास सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गाझामधील निवासी भागांवर इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे दळणवळण विस्कळीत झाल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिला आहे. इस्रायली लष्कराचे रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी टीव्ही न्यूज ब्रीफिंगमध्ये सांगितले की, गेल्या काही तासांत आम्ही गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत. ते म्हणाले की आम्ही शुक्रवारी रात्री गाझामध्ये जमिनीवर हल्ले तीव्र करू. इस्रायली हवाई दल गाझातील बोगदे आणि इतर पायाभूत सुविधांवर जोरदार बॉम्बफेक करत आहे. गाझातील स्थानिक लोकांना दक्षिण गाझाच्या दिशेने जाण्यास सांगण्यात आले आहे.









