Israel Hamas War | इस्रायल-हमास युद्धात ४७ दिवसांनंतर युद्धविराम! हमासकडून 50 ओलिसांची होईल सुटका, त्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनींनाही सोडणार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Israel Hamas War | इस्रायल-हमास युद्धात ४७ दिवसांनंतर युद्धविराम! हमासकडून 50 ओलिसांची होईल सुटका, त्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनींनाही सोडणार | Navarashtra (नवराष्ट्र)


इस्रायल-हमास युद्धात ४७ दिवसांनंतर युद्धविराम! हमासकडून 50 ओलिसांची होईल सुटका, त्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनींनाही सोडणार

इस्रायली मंत्रिमंडळाने हमाससोबत ९६ तासांच्या युद्धविरामाला मान्यता दिल्याचे उघड झाल्यानंतर हमासच्या कैदेत असलेल्या इस्रायली ओलीसांसाठी आज दिलासादायक बातमी आली. त्या बदल्यात हमास ५० इस्रायली ओलीसांची सुटका करेल. यामध्ये महिला, माता आणि लहान मुलांचा समावेश आहे.

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला (Israel Hamas War) गेल्या 47 दिवस पुर्ण झाले आहे आहे. अजुनही इस्रायलने हमासवर हल्ले करणं थांबवलेलं नाही. या युद्धाची झळ संपुर्ण इस्रायलला बसली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला नरसंहार पाहता आता 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर (Israel Hamas War) अखेर युद्धविराम ( ceasefire ) झाला आहे.  इस्रायली कॅबिनेटने चर्चेनंतर हमाससोबतच्या युद्धात युद्धविराम मंजूर केला आहे. त्या बदल्यात हमास ५० इस्रायली ओलीसांची सुटका करेल. तर,  50 ओलिसांच्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनी ओलिसांनाही सोडणार आहे.

हे सुद्धा वाचा

हमास करणार ओलिसांचीा सुटका

इस्रायल सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, हमास येत्या 4 दिवसांत या 50 ओलीसांची सुटका करेल. इस्रायलचा हा हल्ला पूर्णपणे थांबेल. अहवालानुसार, हमास ज्या 50 ओलिसांची सुटका करणार आहे त्यामध्ये  30 मुले, 8 माता आणि 12 महिलांचा समावेश आहे. त्यांना 10 ते 12 च्या गटात सोडले जाईल.






Source link