Israel Hamas war : भीषण! UN च्या शाळेवर इस्रायलचा हल्ला, ३० जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी

0
17
Israel Hamas war : भीषण! UN च्या शाळेवर इस्रायलचा हल्ला, ३० जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी


अल-जजीराने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल-हमासमध्ये  युद्ध सुरू झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी जबलिया कॅम्पमधून दाखल झाले आहेत. आता इस्रायली लष्कराने कॅम्पमध्ये असलेल्या शाळेला  निशाणा बनवले आहे. त्याचबरोबर उत्तर गाझा येथील इंडोनेशियाई रुग्णालयावरही इस्रायलीने हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी सांगितलं की,  गाझातील अनेक रुग्णालयावर बॉम्बफेक करण्यात आली असून आता शाळांनाही लक्ष्य केलं जात आहे.



Source link