
पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 RR vs LSG : आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात देवदत्त पडिक्कलला लखनौ सुपर जायंट्सकडून पदार्पण कॅप देण्यात आली. आरआरची धावसंख्या 5 षटकांत 2 बाद 49 झाली आहे.
बटलर बाद
दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राजस्थानला पहिला धक्का बसला. संघाचा सलामीवीर जोस बटलर 11 धावा करून बाद झाला. त्याला नवीन-उल-हकने विकेटकीपर केएल राहुल करवी झेलबाद केले.
राजस्थान रॉयल्सचा संघ :
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ :
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आवेश खान, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन उल हक, यश ठाकूर.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने म्हणाला, ‘फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली दिसत आहे. जयपूरला येऊन नेहमीच छान वाटतं. संघातील युवा खेळाडूंनी गेल्या वर्षभरात स्वत:चं नाव कमावलं आहे. रियान पराग चौथ्या क्रमांकावर खेळणार असून तीन परदेशी खेळाडूंचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.’
एलएसजीचा कर्णधार केएल राहुल म्हणाला, ‘टॉस जिंकला असतातर आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकुल दिसत आहे. मैदानावर परत आल्याने मी आनंदी आहे, गेल्या काही वर्षांत मी दुखापतीने ग्रसलो होतो. पण, यामुळे तुम्हाला चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि जोमाने पुनरागमन करण्यास मदत होते. क्विंटन डी कॉक, पूरन, स्टॉइनिस आणि नवीन-उल-हक हे आमचे चार परदेशी खेळाडू आहेत.’
🚨 Toss 🚨
Time for Match 4️⃣ of #TATAIPL 🙌@rajasthanroyals win the toss and elect to bat against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/MBxM7IvOM8#RRvLSG pic.twitter.com/fRNnp2L8hD
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024







