
India UK Relations : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पीओकेमधील ब्रिटिश उच्चायुक्तांच्या भेटीवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच, या कृतीचे वर्णन भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणारे आहे.
पाकिस्तानमधील यूके उच्चायुक्तांची पीओकेला भेट : भारत सरकारने ब्रिटिश उच्चायुक्त जेन मॅरियट यांच्या पाकव्याप्त काश्मीरच्या भेटीला विरोध दर्शवला आहे. ब्रिटीश उच्चायुक्तांच्या या भेटीचे वर्णन केंद्रीय गृहमंत्रालयाने आक्षेपार्ह म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात अधिकृत प्रकाशनदेखील जारी केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे असे उल्लंघन पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी परराष्ट्र सचिवांनी भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तांकडे तीव्र निषेधही नोंदवला आहे.









