Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशIndia corona Cases | कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर, गेल्या 24 तासात...

India corona Cases | कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर, गेल्या 24 तासात देशात 328 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

India corona Cases | कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर, गेल्या 24 तासात देशात 328 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर, गेल्या 24 तासात देशात 328 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू!

कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठकही घेतली आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू आहे. देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून आता 7 मे ला तिसऱ्या टप्प्यातली मतदान होणार आहे. पण या निवडणूकीच्या वातावरणात नागिरकांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ (India corona Cases) झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 328 नवे रुग्ण आढळले असून, या काळात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 2997 सक्रीय रुग्ण आहे. कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठकही घेतली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं वाढवली चिंता

काही दिवसापुर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 देशात आढळला होता. केरळमध्ये झपाट्याने या व्हेरियंटचे रुग्ण आढळत होते. कोविडच्या नवीन उप-प्रकारानं सगळ्यांची चिंता वाढत होती. JN.1 प्रकार हे SARS-CoV-2 चे उप-प्रकार आहे. हा प्रकार Omicron कुटुंबातील असल्याचे मानले जाते. कर्नाटकात कोविड-19 उप-प्रकार JN.1 ची प्रकरणे वाढत असल्याने, राज्यातील खासगी शाळांना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. देशभरात आतापर्यंत JN.1 उप-प्रकारचे एकूण 21 कोविड-19 प्रकरणे आढळून आली आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments