IND vs AUS U-19 : भारताकडून ऑस्ट्रेलियाला तीन धक्के | पुढारी

0
15
IND vs AUS U-19 : भारताकडून ऑस्ट्रेलियाला तीन धक्के | पुढारी









पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा एकदा आज वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. परंतु, हा सामना अंडर-19 संघांमध्ये होत आहे. द. आफिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs AUS U-19)

ऑस्ट्रेलियाचा हॅरी डिक्सन बाद, 23 षटकांत 3 बाद 100

ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. सेटचा फलंदाज हॅरी डिक्सन 42 धावा करून बाद झाला. नमन तिवारीने त्याला मुरुगन अभिषेककरवी झेलबाद केले.

विबगेनचे अर्धशतक हुकलं, ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 2 बाद 94

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वायबगेनचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. 21व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नमन तिवारीने त्यांना 48 धावांवर बाद केले. डिक्सन आणि वायबगेन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी झाली.

ऑस्ट्रेलियाला पहिला झटका; सॅम कोनस्टास बाद

सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सॅमच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानीने क्लीन बोल्ड केले. आपल्या आठ बॉलच्या खेळीत सॅमला धावांचा भोपळाही फोडता आला नाही. (IND vs AUS U-19)

भारताची शिस्तबद्ध गोलंदाजी; ऑस्ट्रेलियला 44 धावांवर रोखले

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यातील अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 44 धावा केल्या. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सॅमच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानीने क्लीन बोल्ड केले. आपल्या आठ बॉलच्या खेळीत सॅमला धावांचा भोपळाही फोडता आला नाही. यानंतर डीक्सन आणि वेईब्गन यांनी संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सांभाळला.

 

हेही वाचा :











Source link