Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत मांजाने बांधकाम व्यावसायिकांचा गळा कापला ; मांजाचं भूत यावर्षी देखील जागं...

बारामतीत मांजाने बांधकाम व्यावसायिकांचा गळा कापला ; मांजाचं भूत यावर्षी देखील जागं झाल !

बारामती : अनिल मोहन कायगुडे हे बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात राहणारे बांधकाम व्यवसायिक आहेत. आज सकाळच्या वेळी ते मएसो शाळेपासून एमआयडीसीतील त्यांच्या घरी निघाले होते, मात्र महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेजवळ रस्त्याच्या आडवा अडकलेला मांजा त्यांना दिसलाच नाही आणि दुचाकीवरील कायगुडे यांच्या गळ्याला माझ्या चिरला. याने कायगुडे गंभीर जखमी झाले.

चायनीज मांज्यावर किंवा दोरी घेऊन त्याला काच लावून तयार केला जात असलेल्या देशी मांज्यावर बंदी असताना देखील मांजा उडवण्याचा प्रमाण काही कमी होत नाही. बारामतीत गेल्यावर्षी पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे दाखवले. यावर्षी पुन्हा देखील मांजाचे भूत जागे झाले. आज तर बारामतीत एका बांधकाम व्यवसायकाचा गळाच या मांजाने कापला गेला.

त्यांना तातडीने बारामतीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अत्यंत वेगाने त्यांना दवाखान्यात उपचार केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र या स्थितीमुळे पुन्हा एकदा मांजा खरोखरच शहरातून हद्दपार झाला आहे का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुळात दुकानदारांवर जुजबी कारवाई करण्यात अर्थच नाही. या दुकानदारांवर अत्यंत कठोर कारवाईची आवश्यकता आहे. ज्या दुकानदारांना व्यवसायात विकत असलेली वस्तू विषारी आहे याचे काहीच देणे घेणे नाही, अशा दुकानदारांविषयी ममत्व बाळगण्याचे काहीच कारण नाही. मात्र कारवाई कठोर होत नसल्यानेच अशा दुकानदारांचे फावत असल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. कायगुडे यांच्या प्रकरणात तपास करताना मांजा जर कुठे व्यावसायिकाकडे आढळला, तर कायद्यातील कलमांच्या तरतुदीचा योग्य तो वापर करून तो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा अशाच स्वरूपात दाखल करावा अशीच नागरिकांची मागणी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments