
फलटण : – फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्यामुळे तालुक्यातील राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या बैठकीत स्थानिक विकासकामांचा आढावा, आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बळकटीकरण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणांवर या बैठकीचा प्रभाव पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. श्रीमंत रामराजे नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही बैठक फलटणच्या राजकारणाला नवी दिशा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








