भूतकाळाला जर भूतकाळातच नाही सोडला तर तो वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही नष्ट करतो….!!!

0
61
भूतकाळाला जर भूतकाळातच नाही सोडला तर तो वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही नष्ट करतो….!!!


साहस Times :- श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराज साहेब )
लोकनायक ते जलनायक असं विलक्षण अभ्यासू वृत्ती असलेले एक व्हिजनरी लोकनायक… व्हिजनरी जलनायक अशीच आपली ओळख निर्माण करण्यात यशवंत झालेले परफेक्शनिस्ट प्रतिमामिस्टर क्लीन प्रतिमा असलेले एक उत्तम प्रशासक , राजकारणी म्हणून तरुणाईसह ज्येष्ठापर्यंत सर्वाना आदर वाटतो असे अष्टपैलू नेतृत्व म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ..!
फलटण तालुका समृद्ध कधी होईल, काळाबरोबर फलटण तालुक्याचे आधुनिकीकरण कसं होईल, फलटण तालुक्यातील बाजारपेठेला ऊर्जितावस्था कशी येईल, फलटण तालुक्यात एज्युकेशनल हब, काळानुरूप विविध स्तरातील इन्फ्रास्ट्रक्चरल, विविध स्तरातील समाजमन जपणारी रोजगारकेंद्र पूर्व भागांतून ते उत्तर भागापर्यंत उपलब्ध कशी होतील व विशेषतः लघुउद्योग निर्मितीसाठी प्राधान्याने लक्ष केंद्रित करून लघुउद्योजक कसे निर्माण होतील व सामान्यातील सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध होवून त्यांचे आर्थिक जीवनमान कसे उंचावले जाईल यांची ब्ल्यूप्रिंट ची जबाबदारी व खबरदारी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या कडे सोपवली आहे व ते जबाबदारीचे आव्हान घेऊन फलटण नगरीचे रुपांतर औद्योगिक नगरी म्हणून येत्या वर्षाअखेर नावारुपाला येईल यात आत्ता काही शंका राहिली नाही , याकामी स्वतःहून श्रीमंत अनिकेत राजे यांनी महाराज साहेबांच्या सुचनेनुसार पुढाकार घेऊन समृद्ध मार्गक्रमण चालू आहे.
मागील आठवड्यात मुंबई नवी मुंबई व पुणे येथे चार उद्योग जगतातील व्यवस्थापनाशी बैठकांचे सत्र महाराष्ट्र राज्यांचे उप मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे यामुळे काही महिन्यांत फलटण तालुक्यात सुरवडी व उत्तर भागात औद्योगिक क्रांती होण्याचे संकेत मिळत आहेत यामुळे फलटण तालुक्यातील अनेक युवा वर्गाला रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.
लोक कल्याणकारी ध्येयनिष्ठ व ध्येयनिश्चिती करून महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरणविस्तारीकरण होण्यासाठी नुकत्याच दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या त्यातील एक होता नॅसकाॅम आणि महाराष्ट्र सरकार यातील आणि दुसरा नॅसकाॅम प्रतिष्ठान आणि राज्याचीच लघुउद्योग विकास संस्था ( MSSID C) यातील याचा मुख्य उद्देश राज्यात मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात उद्योग संधी उपलब्ध व निर्माण करणे याकामी राज्यांचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांच्या माध्यमातून श्रीमंत अनिकेत राजे वाटचाल करीत आहेत लवकरच फलटण मध्ये फास्टेस्ट औद्योगिक क्रांती होण्यासाठी मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मा. खा.शरदचंद्रजी पवार साहेब व काही मान्यवर सहित काही उद्योगपतींची भेटी घेणार आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेहमीच म्हणतात, महाराष्ट्राचा राष्ट्रीय सकल राष्ट्रीय उत्पन्नात १४%वाटा आहे आणि एकंदरीत एकूण राष्ट्रीय थेट परकीय गुंतवणूकपैकी ३१ते३७% राज्यात होते म्हणून महाराष्ट्राला ” भारताची स्टार्टअप राजधानी” म्हणून संबोधले जाते, आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत यामुळेच आपल्या फलटण तालुक्यात असे शेकडो उद्योगाचे जाळे निर्माण करण्यासाठी इथून पुढं पावलं जोमाने टाकली जाणार म्हणून यांची सर्वस्वी जबाबदारी श्रीमंत अनिकेत राजे व काही फलटण तालुक्यातील युवा वर्गाला बरोबर घेऊन करणार असल्याचा चंग बांधला आहे .
श्रीमंत रामराजे यांना फलटण तालुका क्लस्टर डेव्हलपमेंट आधारित एक विकासाचा तालुका म्हणून देशभरात ओळख झाली पाहिजे अशी संकल्पना सातत्याने मांडत असतात कारण आजूबाजूला मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब चा आत्तापासूनच विचार व वापर केला तर न भूतो ना भविष्यातो असा कायापालट होईल.
यामुळे फलटण तालुक्याला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रुपाने एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा श्रीमंत अनिकेत राजे हा विकासाचा वारकरी मिळाला …!!

आपलं फलटण…. हरित फलटण…मी फलटण कर…! ‌.