Wednesday, September 30, 2026
Homeसातारादोन दिवसांत मी सांगणार. तुम्ही गडबड करु नका, भविष्याची आखणी करून निर्णय...

दोन दिवसांत मी सांगणार. तुम्ही गडबड करु नका, भविष्याची आखणी करून निर्णय घेऊ : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटणः दि २१ मार्च २०२४ रोजी फलटण येथील अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थिती माण , खटाव ‘ कोरेगाव व फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता . यामध्ये होवू घातलेल्या माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ” सागर ” या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांची बैठक संपन्न झाली होती यामध्ये श्रीमंत रामराजे यांनी महायुतीचे काम करावे व महायुतीच्या धर्म पाळवा असे सांगण्यात आले . परंतू सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना काही वेगळ्याच आहेत , एक तर संजीवराजे यांना तिकिट द्यावे किंवा त्यांनी तुंतारी हातामध्ये घ्यावी , काही झाले तरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करणार नाही अशी भावना अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली .

यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की  भावनेच्या भरात तुतारी धरु, मशाल धरु, शिट्टी धरु, हे चालणार नाही. रामराजे आम्ही तुमच्याबरोबर राहू, असा शब्द कार्यकर्त्यांकडे मागत भविष्याची आखणी करुन दोन दिवसांत निर्णय घेऊ, त्यासाठी आपले नेते अजितदादांकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार असल्याची घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. शिवाय रणजितसिंह वागणं बदलणार असतील, माफी मागणार असतील तर ठिक नाहीतर मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार नाही, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

येथील अनंत मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रभाकर घार्गे, संजीवराजे, रघुनाथराजे, शिवरुपराजे खर्डेकर, लालासाहेब शिंदे, संजय साळुंखे, मंगेश धुमाळ अनिल देसाई, बाळासाहेब सोळसकर, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, बंडा गोडसे, सुभाष नरळे, नंदकुमार मोरे, मनोज पोळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही रणजितसिंहांचे काम करणार नाही, संजीवराजेंना उमेदवारी मागा, वेळप्रसंगी तुतारीचे चिन्ह घेऊन लढा, विजयसिंह मोहिते-पाटील यांना साथीला घेऊन निर्णय घ्या, असे सांगतानाच आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत चेंडू रामराजेंच्या कोर्टात टाकला.

शेवटी मार्गदर्शन करताना रामराजे म्हणाले, गेल्या पाच दहा वर्षांपासून रणजितसिंहांचा त्रास जिल्ह्याला आहे. मी सांगितले आम्हाला सीट बदलून पाहिजे. एक लक्षात घ्या. आपण महायुतीचे एक सदस्य आहोत. संजीवराजेंनी तुम्हाला जे सांगितले. महायुतीत आपण का गेलो. आपण निर्णय घेणार आहे. दोन दिवसांत मी सांगणार. तुम्ही गडबड करु नका, भविष्याची आखणी करून निर्णय घेऊ. मोदी साहेबांवर बोलण्या इतपत मोठे नाही. भाजपचं काय चुकतंय हे ऐकायला, बोलायला हा मेळावा नसून भावना ऐकायला बोलावलं होतं. ज्या नेत्याच्या मागे आपण गेलो होतो. त्यांना कळावे यासाठी हा मेळावा होता.

ज्यांना आमच्या मतांची गरज नसेल तर आपण का म्हणावं की आमची मतं घ्या, मतं घ्या. पण, त्यांना वाटतंय रामराजेंशिवाय निवडून येऊ शकतो. मी स्पष्ट सांगतो. मी शब्द बदलणारा नेता नाही. 1999 पासून शरद पवारांच्या मागे राहिलो. त्याचा फायदाच झाला. भावनेच्या भरात तुतारी धरु, मशाल धरु, शिट्टी धरु, हे चालणार नाही. रामराजे आम्ही तुमच्याबरोबर राहू, असे उभे राहून सर्वांनी सांगा. भावनेने राजकारण होत नाही. ही निवडणूक शेवटची नव्हे. पुढच्या निवडणुकीशी बांधून काही होणार आहे ते पाहू. काय करायचंय ते नेत्यांवर सोपवू. संजीवराजेंना उमेदवारीचा निर्णय आपला होता.

रणजितसिंहांनी सुडाचं राजकारण करू नये, आजपर्यंत बरेच गट असतानाही, सत्ता असतानाही आपण असलं राजकारण केलं नाही, सत्तेचा माज केला नाही. ते माज करताहेत. प्रशासन आज यांचं ऐकतंय हे थांबलं तर भविष्य नाहीतर रहात नाही. वाळू, पोलीस, महसूल. मला वादात पडायचं नाही. त्या माणसांनं सुडांच राजकारण करणार नाही, दम भरणार नाही, असा शब्द द्यावा, असं बोलावं. आजपर्यंत साधा फोन नाही. आमदार गोरे असं बोलतात जसां जिल्हा यांचा आहे. आताचा उमेदवार माझा तालुका आहे, असं वागत असतील तर ठिक.

हा उमेदवार नको असं मी श्रेष्ठींना स्पष्ट सांगितले होते. त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही. मोदींवर बोलणार नाही. आपलं देणंघेणं अजित पवारांशी आहे. आज फक्त फलटणचा प्रश्न नाही, खटावचा प्रश्न, माणचा प्रश्न आहे. मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार नाही. मग काय करायचं ते करा. आपलं एक शिष्टमंडळ जाईल, असे शेवटी रामराजेंनी जाहीर केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments