
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. त्याने फिटनेस आणि डान्स कौशल्याच्या आधारावर प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच हृतिकने त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी हृतिकसाठी शुभेच्छांच्या पोस्ट लिहिल्या होत्या. दरम्यान, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने देखील एक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.







