
पुढे हेमांगी म्हणाली, ‘टायटॅनिक, दयावान यांसारखे सिनेमे आम्ही एकत्र बसून बघितले आहेत. माझी आई सातवी पास आणि माझ्या बाबाचे एलएलबी पर्यंत शिक्षण झाले आहे. वन रुम किचनमध्ये आम्ही राहात होतो. आई आणि बाबांची प्रायव्हसी आम्ही पाहिलेली आहे. एकदा माझ्या ताईला मी प्रश्न विचारला की, आई-बाबा काय करत होते? तेव्हा ताईने माझ्यासोबत त्या विषयांवर चर्चा केली होती.’ हेमांगीच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.








