Heeramandi first look : ओटीटीवर होणार मोठा धमाका! संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ची जोरदार चर्चा

0
40
Heeramandi first look : ओटीटीवर होणार मोठा धमाका! संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ची जोरदार चर्चा


‘हीरामंडी : द डायमंड बाजार’चा फर्स्ट लूक पाहून संजय लीला भन्साळींच्या प्रत्येक प्रोजेक्टप्रमाणेच ही सीरिज देखील भव्य दिव्य असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. संजय लीला भन्साळी यांची ही पहिलीच वेब सीरिज असणार आहे. या वेब सीरिजमध्ये भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वीचे कथानक दाखवण्यात आले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या सीरिजची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. संजय लीला भन्साळी त्यांच्या रॉयल टच कथांमुळे अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘देवदास’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’सारखे हिट चित्रपट देऊन रसिकांची मने जिंकली आहेत. संजय लीला भन्साळी यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे. आता त्यांचा हा आगामी प्रोजेक्ट देखील अशाच एका हटके विषयावर असणार आहे.



Source link