
भारतात झपाट्याने वाढणाऱ्या हृदयविकाराचा झटका कोरोना महामारीशी संबंधित आहे का? असा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. याबाब आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोना होऊन गेलेल्या लोकांनी शारिरिक श्रम कमी करायला हवं असं म्हण्टलं आहे.
जगभरात कोरोनाची साथ येऊन चार वर्ष झाले आहेत तरीही अद्यापपर्यंत कोरोनाचं संकट टळलेलं नाही.अजूनही भारतात अनेक कोरोनाच्या केसेस आढळत आहेच. त्यात भारतात सध्या हृदयविकाराचा झटक्याने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकाराचा झटक्याने होणारे मृत्यू कोरोना महामारीशी संबंधित आहे का? असा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी हृदयविकाराचे खरे कारण आणि ते टाळण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
काय म्हणाले आरोग्य मंत्री?
मांडविया यांनी रविवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासाचा हवाला दिला आणि सांगितले की ज्या लोकांना पूर्वी गंभीर कोविड-19 आजार झाला होता त्यांना एक किंवा दोन वर्षांसाठी हृदयविकारापासून स्वताचा बचाव केला पाहिजे. ज्यांना कोरोनाची लागण झाली होती अशा लोकांनी जास्त मेहनत करणे टाळले पाहिजे. असं ते म्हणाले.










