
फलटण – फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 97 हरकतींची सुनावणी उद्या, 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ही सुनावणी उपविभागीय अधिकारी प्रांत यांच्या दालनात, उपविभागीय कार्यालय फलटण येथे पार पडणार असून नागरिकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हरकत दाखल करण्याचा शेवटचा दिवस 31 ऑगस्ट 2025 दुपारी तीन वाजेपर्यंत होता. त्या मुदतीपर्यंत खालील प्रमाणे एकूण 97 हरकती दाखल झाल्या –
- प्रभाग क्र. 2 – 6 हरकती (समान आशयाच्या 83 हरकती)
- प्रभाग क्र. 8 – 2 हरकती
- प्रभाग क्र. 13 – 3 हरकती (तिन्ही समान आशयाच्या)
- प्रभाग क्र. 9 – 1 हरकत
- प्रभाग क्र. 6 – 1 हरकत
- सर्वसाधारण प्रभाग रचना – 2 हरकती
ज्या नागरिकांनी वेळेत लेखी हरकती नोंदवल्या आहेत, त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी व प्रशासक निखिल मोरे यांनी केले आहे.







