HDFC Bank | HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! या रक्कमेसाठी आता…, पाहा एचडीएफसीचा महत्त्वाचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)

0
7
HDFC Bank  | HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! या रक्कमेसाठी आता…, पाहा एचडीएफसीचा महत्त्वाचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)


HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! या रक्कमेसाठी आता…, पाहा एचडीएफसीचा महत्त्वाचा निर्णय


HDFC Bank : तुम्ही जर एचडीएफसी ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण एचडीएफसीने एका ठराविक रक्कमेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहs

तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्याशी संबंधित आहे. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने ग्राहकांसाठी एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आले की, आता ते कमी रकमेच्या UPI व्यवहारांसाठी एसएमएस (SMS) अलर्ट पाठवणे बंद करणार आहे. याचा अर्थ असा की बँक आता ग्राहकांना 100 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास किंवा UPI द्वारे 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यासच त्यांना एसएमएस अलर्ट येणार नाही.

तसेच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना सर्व व्यवहारांसाठी ईमेल अलर्ट मिळणार आहे. नियमानुसार, 5,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी बँकांना एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. मात्र यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर अनेक बँका अलर्टही पाठवतात. एचडीएफसी बँकेला ग्राहकांकडून फीडबॅक मिळाला आहे की त्यांच्यासाठी लहान रकमेच्या व्यवहारांसाठी अलर्ट मिळणे फार महत्वाचे नाही. त्यानंतर एचडीएफसी कडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.






Source link