Harshvardhan Rane Birthday: हर्षवर्धन राणेने संजय भन्साळींच्या ‘रामलीला’ला दिलेला थेट नकार! कारण माहितीये का?

0
13
Harshvardhan Rane Birthday: हर्षवर्धन राणेने संजय भन्साळींच्या ‘रामलीला’ला दिलेला थेट नकार! कारण माहितीये का?


Happy Birthday Harshvardhan Rane: आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात हक्काची जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणून हर्षवर्धन राणे याचे नाव घेतले जाते. मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नसताना देखील त्याने आपली जादू रसिक प्रेक्षकांच्या मनावर पसरवली आहे. आज अभिनेता हर्षवर्धन राणे याचा वाढदिवस आहे. १६ डिसेंबर १९८३ रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या हर्षवर्धनला बॉलिवूडमध्ये अद्याप अशी भूमिका मिळू शकलेली नाही, ज्यामुळे त्याला तुफान प्रसिद्धी मिळेल. अजूनही अभिनेता छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्येच झळकत आहे. असा एक बिग बजेट चित्रपट हर्षवर्धनच्या वाट्याला आला होता. मात्र, त्याने तो थेट नाकारला होता. हर्षवर्धन राणे याला संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटामध्ये रणवीरची भूमिका आधी हर्षवर्धन साकारणार होता. मात्र, नंतर एका छोट्याशा कारणामुळे हर्षवर्धन याने चित्रपटाला थेट नकार दिला.



Source link