
मुलाखतीदरम्यान हार्डीने खुलासा केला की, डान्स केल्यानंतर या चाहतीने त्याला विचारले की, मी तुला एकदा मिठी मारू शकते का? ज्यावर हार्डीने तिला मिठी मारण्याची परवानगी दिली. यानंतर चाहतीने हार्डीला मिठी मारली आणि अचानक त्याचे कान चाटू लागली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे हार्डीला चांगलाच धक्का बसला. आपल्यासोबत घडलेली ही घटना सांगताना तो म्हणाला की, कल्पना करा जर माझ्याकडून असा प्रकार घडला असता, तर काय झालं असतं? पण, या अशा गोष्टी आपल्याला देखील सहन कराव्या लागतात, असे तो म्हणाला.








