
Hardeek Joshi Cried On National TV: टीव्ही विश्वाचा लाडका ‘राणा दा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सध्या ‘जाऊ बाई गावात’ या हटके शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमध्ये केवळ देशातील नाही तर, परदेशात वास्तव्य करणाऱ्या काही तरुणी भारतात येऊन महाराष्ट्रातल्या बावधन या गावात राहत आहेत. अतिशय लक्झरी आयुष्य जगणाऱ्या या तरुणी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात येऊन तिथल्या लोकांसोबत राहून तांबड्या मातीचा अनुभव घेत आहेत. अगदी सुखवस्तू कुटुंब आणि ऐशोआरामाचं जगणं सोडून या तरुणींना गावातल्या मातीत राबावं लागत आहे. या हटके विषयाच्या शोमध्ये आता भावनिक वातावरण पाहायला मिळणार आहे. तर, यावेळी एका खास व्यक्तीच्या आठवणीत हार्दिक जोशी याच्या अश्रूंचा बांध देखील फुटणार आहे.







