Friday, August 14, 2026
Homeसाताराभव्य बैलगाडा शर्यती सोमवार दि ११ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी...

भव्य बैलगाडा शर्यती सोमवार दि ११ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा या वेळात फलटण येथे होणार : सागर अभंग

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांना भरविलेल्या भव्य बैलगाडा शर्यती सोमवार दि ११ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा या वेळात होणार असून या शर्यती फलटण येथील साई मंदिराच्या शेजारी जाधववाडी येथे भरविण्यात आल्या आहेत . महाराष्ट्रासह इतर राज्यातून बैलगाडा येणार आहेत . बैलगाडा शर्यतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे . स्पर्धेचे आकर्षण पाहत . याठिकाणी खास करून महिल्यांना बैलगाडा शर्यती पाहता यावी यासाठी महिला प्रेक्षकांना विशेष गॅलरीचे आयोजन केले असल्याची माहिती बैलगाडा शर्यतीचे आयोजक विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली .

गटातील प्रथम येणाऱ्यांना आकर्षक अशी चांदीची गदा

  • स्पर्धेत सहभागी असणाऱ्या पडूंना चारा व पाणी मोफत
  • बैलगाडा शर्यत स्पर्धा ही अत्यंत पारदर्शक
  • विविध ठिकाणी ड्रोन कॅमेरे
  • पूर्ण स्पर्धा यूट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण
  • स्पर्धेत नामांकित झेंडा पंच
  • थेट समालोचन
  • महिलांसाठी विशेष प्रेक्षक गॅलरी
  • 250 पेक्षा जास्त एलईडी लाइट्स.
  • एलईडी स्क्रीनम्बुलन्स

   . ॲम्बुलन्स सुविधा

या भव्य बैलगाडा शर्यती सोमवार दि. 11 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात होणार असून स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर लगेच विविध मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस समारंभ होणार आहे. यावेळी खासदार छत्रपतीउदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार राम सातपुते, विरोधी पक्ष नेते फ.न.प., फलटण समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments