Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशGoa Crime Case | आईनेच 4 वर्षाच्या मुलाचा खून करत मृतदेह...

Goa Crime Case | आईनेच 4 वर्षाच्या मुलाचा खून करत मृतदेह भरला बॅगेत; गोव्यातील खून प्रकरणामध्ये फिल्मी स्टाईलने अटक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आईनेच 4 वर्षाच्या मुलाचा खून करत मृतदेह भरला बॅगेत; गोव्यातील खून प्रकरणामध्ये फिल्मी स्टाईलने अटक

बंगळुरूमध्ये सीईओ पदावर कार्यरत असणारी ही महिला गोव्यामध्ये फिरायला गेली आणि तिथेच असणाऱ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी महिलेवर केला असून तिला अटक करण्यात आली आहे.

गोवा : बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एक निर्दयी आईने आपल्याच 4 वर्षाच्या चिमुरड्याला जीवे मारल्याचा घटना घडली आहे. बंगळुरूमध्ये (Bangalore) सीईओ पदावर कार्यरत असणारी ही महिला गोव्यामध्ये (Goa Crime Case) फिरायला गेली आणि तिथेच असणाऱ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या (Murder Case) केल्याचा आरोप पोलिसांनी (Goa Police) महिलेवर केला असून तिला अटक करण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, या आरोपी महिलेचे नाव सूचना सेठ असे असून ती नॉर्थ गोव्यातील सोल बनयान ग्रांदे या हॉटेलमध्ये वास्वव्यास होती. तिच्या सोबत तिचा 4 वर्षाचा मुलगा देखील आला होता. मात्र चेक आऊट करताना मुलगा तिच्यासोबत नव्हता. तसेच तिने गोवा ते बंगलुरु प्रवास करण्यासाठी टॅक्सीचा वापर केला. तिने चेक आऊट केल्यानंतर हॉटेल स्टाफ तिची रुम साफ करायला गेले असता तिच्या खोलीमध्ये सर्वत्र रक्ताचे डाग पडलेले दिसून आले. याबाबत हॉटेल मालकाने पोलिसांनी माहिती दिल्यानंतर आरोपी महिलेला फिल्मी स्टाईलमध्ये अटक करण्यात आली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments