
Gautami Deshpande Wedding Ritual Started: मराठी मनोरंजन विश्वातील चुलबुली अभिनेत्री गौतमी देशपांडे आता लग्नबंधनात अडकणार आहे.तिच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर देखील गौतमीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे ही अभिनेता स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदी सोहळा आणि हळद पार पडली आहे. या सोबतच रोमँटिक थीमवर आधारित संगीत सोहळा देखील नुकताच झाला आहे. या सगळ्या सोहळ्याच्या खास झलक गौतमी देशपांडे हिची बहीण मृण्मयी देशपांडे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.








