
अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. तर, त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ते गेल्या वीस वर्षांपासून एकटेच वेगळे राहत होते, असा खुलासा गश्मीरने केला होता. एकत्र राहण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी नेहमीच नकार दिला, असे देखील गश्मीर म्हणाला होता.







