
२००७मध्ये अपूर्व लखिया दिग्दर्शित ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मुंबई पोलिसांनी लोखंडवालामध्ये केलेल्या एन्काऊंटरवर आधारित हा चित्रपट आहे. हे एन्काऊंटर १९९१मध्ये घडले होते. या चित्रपटात संजय दत्त, सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. विवेक ओबेरॉयने यात माया डोळसची भूमिका साकारली होती.






