फलटण शहरातील गणेश भक्तांची एकच मागणी – “गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न नको!”

0
7
फलटण शहरातील गणेश भक्तांची एकच मागणी – “गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न नको!”

फलटण :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी नगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मुख्याधिकारी निखील मोरे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी रस्ते दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची विनंती केली.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून हजारो भाविक शहरात येणार आहेत. अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.