Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशGaganyaan Mission update | इस्रोने 17 किमी उंचीवर गगनयानचं क्रू मॉडेल केलं...

Gaganyaan Mission update | इस्रोने 17 किमी उंचीवर गगनयानचं क्रू मॉडेल केलं लाँच, समुद्रात केलं सुरक्षित लँडिंग! | Navarashtra (नवराष्ट्र)

Gaganyaan Mission update | इस्रोने 17 किमी उंचीवर गगनयानचं क्रू मॉडेल केलं लाँच, समुद्रात केलं सुरक्षित लँडिंग! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रोने 17 किमी उंचीवर गगनयानचं क्रू मॉडेल केलं लाँच, समुद्रात केलं सुरक्षित लँडिंग!

गगनयान टीव्ही-डी1 चे तीन मुख्य पॅराशूट यशस्वी चाचणी वाहन प्रक्षेपणानंतर काही मिनिटांत तैनात करण्यात आले.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून गगनयान मोहिमेचे (Gaganyaan Mission update) पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या करण्यात आलं आहे. इस्रोला दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळालं आहे. क्रू एस्केप सिस्टम आणि क्रू मॉड्यूल 17 किमी उंचीवर लॉन्च करण्यात आलं. यानंतर बंगालच्या उपसागरातील श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर समुद्रात सुरक्षित लँडिंगही झालां.  या मोहिमेत नौदलाचाही सहभाग आहे.

हे सुद्धा वाचा

TV-D1 चं दुसऱ्या प्रयत्नात प्रक्षेपण

मिशन गगनयान टीव्ही डी 1 चाचणी उड्डाण पूर्ण झाले आहे. क्रू एस्केप सिस्टमने उद्दिष्टानुसार कामगिरी केली. मिशन गगनयान यशस्वी झाले,” असे अंतराळ संस्थेने म्हटले आहे.
गगनयान टीव्ही-डी1 चे तीन मुख्य पॅराशूट यशस्वी चाचणी वाहन प्रक्षेपणानंतर काही मिनिटांत तैनात करण्यात आले. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले, “TV-D1 मिशनच्या यशस्वी कामगिरीची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. गगनयान कार्यक्रमासाठी क्रू इजेक्शन सिस्टीमचे प्रात्यक्षिक करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments